देहली विद्यापिठाचे प्रा. राकेशकुमार पांडेय यांचे गंभीर आरोप
देहली विद्यापिठात केरळच्या विद्यार्थ्यांना सहज मिळत आहे प्रवेश !
(‘मार्क्स जिहाद’ म्हणजे साम्यवादी आणि जिहादी विचारधारेच्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण देऊन पुढील शिक्षण घेण्याच्या नावाखाली त्यांना नामांकित विद्यापिठामध्ये घुसवून तेथील वातावरण कलुषित करणे !)
|
नवी देहली – देहली विद्यापिठाच्या चालू असलेल्या प्रवेशप्रक्रियेत ‘केरळ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक प्राधान्य मिळत आहे. देहली विद्यापिठाच्या अंतर्गत येणारे किरोडीमल महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय जनतांत्रिक शिक्षक मोर्च्याचे माजी अध्यक्ष राकेशकुमार पांडेय यांनी या संपूर्ण प्रकारास ‘अंक (गुण) जिहाद’ अथवा ‘मार्क्स जिहाद’ असे संबोधले आहे. पांडेय यांनी एक फेसबूक पोस्टद्वारे याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘After JNU, left plans to grab DU using Mark Jihad’, professor questions high number of students getting 100% marks in Kerala board examshttps://t.co/lSOfAxFEHJ
— OpIndia.com (@OpIndia_com) October 9, 2021
पांडेय यांच्या माहितीनुसार मागील काही वर्षांपासून एका षड्यंत्राच्या अंतर्गत साम्यवादी आणि जिहादी विचारसरणीचे लोक केरळच्या विद्यार्थ्यांना देहली विद्यापिठात घुसवत आहेत. ‘केरळ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या ‘उदारमतवादी’ धोरणामुळे (विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पडताळतांना त्यांना मुक्तपणे गुण देण्याच्या धोरणामुळे) केरळच्या अनेक विद्यार्थ्यांना १२ वीच्या परीक्षेमध्ये १०० टक्के गुण दिले जातात. त्यामुळे देहली विद्यापिठाच्या प्रवेशाच्या निकषांमध्ये अन्य राज्यांच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत केरळचे विद्यार्थी सहज पात्र ठरत असल्याने त्यांना विद्यापिठामध्ये प्रवेश घेता येतो. परिणामी ज्या प्रमाणे साम्यवाद्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापिठावर (जे.एन्.यू.वर) जसे नियंत्रण मिळवले आहे, त्याप्रमाणे ते आता देहली विद्यापिठावरही नियंत्रण मिळवतील, अशी भीती पांडेय यांनी व्यक्त केली आहे.
पांडेय यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की,
१. विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये आणि ‘केरळ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’कडून देहली विद्यापिठात प्रवेश घेण्यासाठी येणार्या आवेदनांच्या संख्येत होणारी आश्चर्यकारक वाढ, हे एक सुनियोजित षड्यंत्र आहे.
२. देहली विद्यापिठाच्या अंतर्गत येणार्या एका महाविद्यालयाला केवळ २० जागा असणार्या एका अभ्यासक्रमासाठी २६ विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागला; कारण या सर्व विद्यार्थ्यांना केरळ शिक्षण मंडळाकडून १०० टक्के गुण मिळाले होते. अशा प्रकारे काही वर्षांपासून देहली विद्यापिठामध्ये अधिकाधिक ‘साम्यवादी’ कार्यकर्त्यांना घुसवण्याचा प्रकार चालू आहे.
३. जिहादी आणि साम्यवादी विचारसरणी असलेल्यांचा भरणा देहली विद्यापिठाला नष्ट करून टाकेल. विद्यापिठात साम्यवादी विद्यार्थी आल्याने येथे विषारी विचारसरणी पसरवली जाईल, तसेच वारंवार संप होतील आणि परिसरात हिंसाचर वाढेल.
४. देहली विद्यापिठात ‘केरळ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’चे विद्यार्थी अधिक संख्येने भरती होत असलेल्या माहितीचे ‘टी.एफ्.आय. पोस्ट’ या वृत्त संकेतस्थळाने विश्लेषण केले आहे. अनारक्षित श्रेणीच्या अंतर्गत भरती झालेल्या २०६ विद्यार्थ्यांपैकी ९५ टक्के विद्यार्थी केरळ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे आहेत. ‘टी.एफ्.आय.’च्या अहवालातून संशय व्यक्त करण्यात आला आहे की, २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश यांच्यामधून जर ९५ टक्के जागांवर केवळ एकटा केरळ ताबा मिळवत असेल, तर केरळ राज्यात एकतर अतिशय चांगली शिक्षणव्यवस्था आहे किंवा काहीतरी घोटाळा आहे.
देहली विद्यापिठाच्या प्रवेशप्रकियेवर अ.भा.वि.प.चा आक्षेप !
देहली विद्यापिठाच्या प्रवेश प्रक्रियेवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप नोंदवला असून गुण देण्याच्या पद्धतीला तर्कसंगत बनवण्याची मागणी केली आहे.
केरळमधील साम्यवादी आणि काँग्रेस यांची प्रा. पांडेय यांच्यावर टीका !
प्रा. पांडेय यांच्या ‘मार्क्स जिहाद’च्या दाव्यामुळे केरळचे मनुष्यबळ विकासमंत्री व्ही. शिवनकुट्टी आणि साम्यवाद्यांची विद्यार्थी संघटना यांनी पांडेय यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पांडेय यांच्या आरोपांना ‘हास्यास्पद’ म्हटले आहे. (साम्यवादी अथवा काँग्रेसी यांच्याकडून प्रा. पांडेय यांचे आरोप फेटाळून लावण्यात येणे, यात नवल नाही; परंतु हे आरोप गंभीर आहेत अन् सकृतदर्शनी तर्कधारित आहेत. त्यामुळे या आरोपांची शहानिशा करणे आवश्यक आहे ! – संपादक)