लखनऊहून मुंबईला येणार्‍या ‘पुष्पक एक्सप्रेस’वर दरोडा

चोरट्यांकडून महिलेवर बलात्कार, २ आरोपींना अटक

प्रवाशांची संख्या अधिक असूनही ते चोरट्यांसमोर काही करू शकले नाहीत ! प्रवाशांनी संघटितपणे चोरट्यांचा प्रतिकार केला असता, तर चोरटे काही करू शकले नसते. नागरिकांनी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे ? हे या घटनेवरून लक्षात येईल ! – संपादक

मुंबई – लखनऊ येथून मुंबईला येत असलेल्या ‘पुष्पक एक्सप्रेस’वर दरोडा टाकून चोरट्यांनी १६ प्रवाशांकडील साहित्य लुटले. यामध्ये चोरट्यांनी एका महिलेवर बलात्कार केला. ८ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता इगतपुरी-कसारा स्थानकाच्या मार्गावर हा दरोडा टाकण्यात आला. यामध्ये ८ चोरट्यांनी १६ प्रवाशांना लुटले. कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरटे घोटी इगतपुरी येथे रेल्वेत चढले. चोरट्यांनी प्रवाशांकडून भ्रमणभाषही हिसकावून घेतले. यांतील ७ चोरटे इगतपुरी येथे रहाणारे असून १ जण मुंबईतील मालवणी येथे रहाणारा आहे. पलायन केलेल्या ६ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.