दक्षिण चीन सागरामध्ये चिनी नौकांच्या घुसखोरीवरून मलेशियाने चिनी राजदूताला भेटीसाठी बोलावले !

भारतापेक्षा लहान देश चीनला थेट आव्हान देत असतात, तर भारताला ते का शक्य नाही ? – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

कुआलालंपूर (मलेशिया) –  दक्षिण चीन समुद्रात मलेशियाच्या विशेष आर्थिक क्षेत्रात चिनी नौकांची घुसखोरीत वाढ झाली आहे. यावर आक्षेप घेत मलेशियाने त्याच्या देशातील चीनच्या राजदूताला भेटण्यास बोलावले आहे.

१. चीनची ही कृती संयुक्त राष्ट्रांच्या वर्ष १९८२ च्या सागरी कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. आम्ही आमच्या सागरी सीमांचे संरक्षणासाठी, तसेच सार्वभौमत्व जपण्यासाठी पावले उचलणार आहोत, असे मलेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

२. दक्षिण चीन समुद्र हा सागरी व्यापाराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या भागात नैसर्गिक साधनसंपत्ती अधिक प्रमाणात असल्याचे सांगितले जाते. चीनकडून दक्षिण चीन समुद्राच्या जवळपास सर्वच भागांवर सातत्याने दावा करण्यात येतो. चीनच्या या विस्तारवादी भूमिकेला मलेशिया, फिलीपाईन्स, ब्रुनेई, व्हिएतनाम आदी देश सातत्याने विरोध करत आहेत.