
मालवण – तालुक्यातील आचरा-मालवण मार्गावरून चालत जाणार्या तिघांना एका चारचाकी गाडीने आचरा हायस्कूलसमोर ३ ऑक्टोबरच्या रात्री ठोकरले. या भीषण अपघातात डहाणू, पालघर येथील पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक लोणे यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला, तर एक मुलगी गंभीर घायाळ झाली आहे.
३ ऑक्टोबरला रात्री पोलीस उपनिरीक्षक लोणे त्यांची मुलगी आणि सहकारी जमेंदर प्रसाद यांच्यासह आचरा तिठा येथून आचरा-मालवण मार्गावरून चालत घरी जात होते. त्या वेळी मागाहून आलेल्या भरधाव गाडीने तिघांनाही ठोकरले. स्थानिकांनी तिघांना आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. तेथे प्राथमिक उपचार करून नंतर अधिक उपचारासाठी तिघांनाही कणकवली येथे रुग्णालयात भरती केले. या वेळी उपचार चालू असतांना दीपक लोणे आणि जमेंदर प्रसाद यांचा मृत्यू झाला, तर मुलगी परी दीपक लोणे हिच्यावर उपचार चालू आहेत.
पोलिसांनी चारचाकी गाडीचे चालक कृष्णा राणे (वय ६० वर्षे, रहाणार जानवली, कणकवली) यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. अपघातातील चारचाकी वाहन पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
Sikkim Tunnel Accident : सिक्किममधील निर्माणाधीन बोगद्यात दरड कोसळली : ८ कामगारांचा मृत्यू
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी