फरिदाबाद (हरियाणा) येथे पितृपक्षानिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

फरिदाबाद (हरियाणा) – पितृपक्षानिमित्त येथे २५ सप्टेंबर या दिवशी एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप मुंजाल यांनी ‘पितृपक्षामध्ये श्राद्ध का करावे ?, श्राद्ध केल्यावर होणारे लाभ’, यांविषयी माहिती दिली. तसेच उपस्थितांना त्यांनी ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाचे महत्त्व सांगितले आणि तो उपस्थितांकडून सामूहिकरित्या करवून घेतला. या प्रवचनाचा  लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सिद्धी अग्रवाल यांनी केले. या वेळी उपस्थित जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करण्यात आले.