|
हिंदु संतांवरील तथाकथित आरोपांमुळे अनेक दिवस ‘मीडिया ट्रायल’ चालवणारी प्रसारमाध्यमे (प्रसारमाध्यमांकडून ‘न्यायाधिशा’च्या भूमिकेत जाऊन अनेक दिवस संबंधितांवर यथेच्छ टीका करण्याचा प्रकार) ख्रिस्ती पाद्य्रांच्या गुन्हेगारी कृत्यांवर मात्र पांघरूण टाकतात, हे लक्षात घ्या ! – संपादक

दंतेवाडा (छत्तीसगड) – नक्षलप्रभावित दंतेवाडा जिल्ह्यातील गिदम शहरामध्ये असलेल्या एका चर्चच्या पाद्य्राने ३५ वर्षीय विधवा महिलेवर सतत बलात्कार केला. पीडिता गरोदर राहिल्यानंतर त्याने औषधी दुकानामधून आणलेल्या गर्भपाताच्या गोळ्या तिला बलपूर्वक खायला लावल्या. त्यामुळे पीडितेची स्थिती बिघडल्याने तिला रुग्णालयात भरती करावे लागले. पीडितेची गंभीर स्थिती पाहून आधुनिक वैद्यांनी तिला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये हलवले. याप्रकरणी पोलिसांनी पाद्य्राला अटक केली आहे.
छत्तीसगढ़ में शादीशुदा पादरी ने किया विधवा से लगातार रेप: गर्भवती होने पर खुली पोल, 10 साल पहले बनाया था ईसाई#Chhattisgarh #Church https://t.co/IV0HKFJ1Kx
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 30, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे १२ वर्षांपूर्वी पीडितेच्या पतीचा मृत्यू झाला होता. तिला एक मुलगी आहे. मुलीला सासू-सासर्यांजवळ ठेवून पीडिता मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होती. एकदा ती पुष्कळ आजारी पडली. तेव्हा ख्रिस्ती प्रचारकांनी तिला उपचार करण्यासाठी साहाय्य केले. त्यानंतर त्यांनी तिचे धर्मांतर केले. तसेच तिला रहाण्यासाठी घरही दिले. (हिंदूंच्या असाहाय्यतेचा अपलाभ उठवणारे धूर्त ख्रिस्ती ! हिंदूंना धर्मशिक्षण मिळाले असते, तर ते त्यांच्या जीवनातील कठीण प्रसंगांना धीराने सामोरे जाऊ शकले असते. हिंदूंमधील धर्माभिमानशून्यताच सर्व समस्यांमागील कारण आहे, हे जाणा ! – संपादक)
पोलिसांनी पुढे सांगितले की, अनुमाने २ वर्षांपूर्वी पाद्री बाबुलाला नाग (वय ४३ वर्षे) याने पीडितेला लग्नाचे आमीष दाखवले होते. तेव्हापासून तो पीडितेवर सतत बलात्कार करत होता. या काळात पीडिता २ मासांची गर्भवती राहिली. तेव्हा पाद्य्राने तिला गर्भपात करायला लावला. त्यामुळे तिची स्थिती नाजूक झाली आणि तिला स्थानिक रुग्णालयामध्ये भरती करावे लागले.
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
धर्म पालटल्याने जात पालटत नाही ! : Mumbai HC Nagpur Bench
तमिळनाडू : गोहत्या करणार्यांना पाठीशी घालणार्या मुसलमान संघटनांचा हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !