हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधानंतर उत्तराखंडमधील टिहरी धरणाजवळील अवैध मशीद प्रशासनाने पाडली !  

धरणाजवळ २० वर्षे अवैध मशीद उभी रहाणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

आंदोलनकारी

गढवाल (उत्तराखंड) – राज्यातील टिहरी धरणाजवळ अवैधरित्या बांधण्यात आलेली मशीद प्रशासनाकडून पाडण्यात आली. राज्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि स्थानिक नागरिक यांनी याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. (धरणाजवळ अवैध मशीद बांधली जात असतांना पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? जे स्थानिक नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या लक्षात येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍यांच्या लक्षात येत नाही, असे कसे म्हणता येईल ? याला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक) २० वर्षांपासून असलेली ही अवैध मशीद हटवण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलनही करण्यात आले होते, तसेच ट्विटरवर ट्रेंड (चर्चेत असलेला विषय) करण्यात आला होता. (भाजपचे सरकार असतांना अवैध मशीद हटवण्यासाठी इतका विरोध करावा लागणे अपेक्षित नाही, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)
वर्ष २००० मध्ये टिहरी धरण बांधतांना आलेल्या मुसलमान कामगारांसाठी बांधकाम आस्थापनाने ही तात्पुरती मशीद बांधली होती. धरण बांधून झाल्यानंतर सदर आस्थापन आणि कामगार परत गेले; मात्र मशीद तशीच राहिली. प्रत्येक शुक्रवारी येथे शेकडोंच्या संख्येने मुसलमान नमाजपठण करण्यासाठी येत होते. अनेक जण येथील रस्त्यावरच नमाजपठण करत होते. नमाजपठणाच्या दिवशी स्थानिक महिलांची छेड काढण्याच्या घटनाही घडत होत्या.