मुंबईच्या लोकलगाड्यांवर विषारी वायूच्या साहाय्याने आक्रमण करण्याचा आतंकवाद्यांचा कट !

जोगेश्वरीतून ७ वा आतंकवादी अटकेत !

  • भारताच्या मुळावर उठलेला जिहादी आतंकवाद चिरडण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक
  • जिहादी आतंकवादी भारतात आतंवादी कारवाया घडवून आणण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या काढत आहेत. यावरून जिहादी आतंकवादाच्या विरोधात किती कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, हे लक्षात येते ! – संपादक
(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबई, १८ सप्टेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासमवेत जोगेश्वरीमधील नागपाडा भागातून झाकीर नावाच्या एका संशयित आतंकवाद्याला कह्यात घेतले आहे. ६ आतंकवाद्यांपैकी जान महमंद हा धारावीत रहाणारा आहे. त्याच्याशी झाकीरचा संबंध असल्याचे म्हटले जात आहे. देहली पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईची जीवनरेखा असलेल्या लोकलगाड्यांवर विषारी वायूच्या साहाय्याने आक्रमण करण्याचा कट या आतंकवाद्यांनी रचला असल्याची माहिती उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागाने रेल्वे पोलिसांना सतर्क रहाण्याची सूचना दिली आहे.

१. गुप्तचर विभागाच्या सूचनेनंतर मुंबईतील लोकल स्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही संशयास्पद आढळल्यास कसून तपासणी केली जात आहे. रेल्वे स्थानकांवरील मुख्य प्रवेशद्वार वगळता स्थानकावर येण्या-जाण्याचे इतर सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.

२. अटक करण्यात आलेल्या ६ आतंकवाद्यांनी मुंबईतील लोकलगाड्यांना लक्ष्य करण्याच्या दृष्टीने पहाणी केली होती. लोकलगाड्यांमध्ये विषारी गॅसद्वारे आक्रमण करण्यासह गर्दीच्या स्थानकांवर भरधाव वेगाने वाहन घुसवून प्रवाशांना चिरडण्याचा कट रचला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

यापूर्वीही मुंबईच्या लोकलमध्ये बाँब ठेवून आक्रमण करण्यात आले होते.