कोलकाता येथे धर्मद्रोही हिंदु चित्रकाराकडून हिजाब परिधान केलेल्या श्री दुर्गादेवीचे चित्र रेखाटून घोर विडंबन !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आणि त्यांच्यात धर्माभिमान नसल्याने ते अशा प्रकारचे कृत्य करतात, हे हिंदूंना लज्जास्पद ! स्वातंत्र्यापासून आतापर्यंत हिंदूंना त्यांच्या संघटना, धर्मगुरु आदींनी धर्मशिक्षण न दिल्याचाच हा परिणाम आहे ! हिंदु राष्ट्रात प्रत्येक हिंदूला धर्मशिक्षण देण्यात येईल ! – संपादक

डावीकडे श्री दुर्गादेवीचे विडंबनात्मक छायाचित्र आणि चित्रकार सनातन डिंडा

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

कोलकाता (बंगाल) – येथील चित्रकार सनातन डिंडा यांनी श्री दुर्गादेवीचे चित्र काढले असून त्यात तिने हिजाब परिधान केल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्राखाली त्याने ‘आई येत आहे’ असे लिहिले आहे. नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे चित्र काढले आहे. सामाजिक माध्यमांतून याचा विरोध केला जात आहे.