छत्तीसगडमध्ये धर्मांतराच्या प्रकरणी जमावाने पाद्य्रासह तिघांना पोलीस ठाण्यात घुसून चोपले !  

अन्य एका प्रकरणात जमावाने ख्रिस्ती धर्मप्रचारकाला घरात घुसून चोपले !

  • ख्रिस्तीप्रेमी काँग्रेसच्या राज्यात ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा सुळसुळाट वाढल्यास आणि त्यामुळे त्याचा समाजाला त्रास झाल्यास आश्चर्य ते काय ? छत्तीसगडमध्ये  धर्मांतरावर चाप बसत नसल्याने जमाव कायदा हातात घेत असेल, तर त्याला काँग्रेसचे ख्रिस्तीधार्जिणे धोरण कारणीभूत आहे ! – संपादक
  • केंद्र सरकारने लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा संमत करणे आवश्यक आहे अन्यथा अशा घटना ठिकठिकाणी होऊ लागल्या, तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन देशात अशांतता निर्माण होऊ शकते ! – संपादक

रायपूर (छत्तीसगड) – येथील बस्ती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी हरिश साहू या पाद्र्याला धर्मांतराच्या आरोपाच्या प्रकरणी पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्याच्या समवेत छत्तीसगड ख्रिश्चन फोरमचे सरचिटणीस अंकुश बरियकर आणि प्रकाश मसीह हेही आले होते. (धर्मांतर केलेले हे बाटगे स्वतःची हिंदु नावे कायम ठेवतात. असे करून अन्य हिंदूंची दिशाभूल करून त्यांचे धर्मांतर करणे त्यांना सोपे जाते, हे लक्षात घ्या ! – संपादक) या तिघांना जमावाने पोलीस ठाण्यात घुसून चोपले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. या घटनेच्या विरोधात ख्रिस्त्यांकडून पोलीस ठाण्याबाहेर प्रार्थना करण्यात आली, तर हिंदूंकडून हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले.

कबीरधाम जिल्ह्यात हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला चोप !

अन्य एका घटनेत कबीरधाम जिल्ह्यातील एका दुर्गम गावात कवलसिंह परस्ते नामक ख्रिस्ती धर्मप्रचारकाच्या घरात घुसून गावकर्‍यांनी त्याला चोपले. यावेळी जमावाने आदिवासींचे धर्मपरिवर्तन थांबवण्यासाठी घोषणा दिल्या. जमावाने ख्रिस्ती धर्मप्रसारकाला आदिवासींचे धर्मांतर न करण्याविषयी समजही दिली. छत्तीसगडच्या ‘ख्रिश्चियन फोरम’च्या अध्यक्षांनी राज्य सरकार आणि पोलीस यांच्यावर आरोपींच्या विरोधात योग्य कारवाई न करण्याचा आरोप केला होता. (ख्रिस्त्यांचा थयथयाट ! जमाव प्रक्षुब्ध होण्यास धर्मांध ख्रिस्त्यांच्या कारवाया कारणीभूत आहेत. त्यामुळे अशा धर्मांध ख्रिस्त्यांवर प्रथम कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)