देहली – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली, हरियाणा, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील धर्मप्रेमींसाठी २९ ऑगस्ट या दिवशी ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्याना’चे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाला अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते. धर्मप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे समितीच्या वतीने पुढील ८ दिवसांसाठी २ ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणवर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्मप्रेमींचे अभिप्राय
१. श्री. संजय सिकरवार, देहली – या कार्यक्रमामुळे असे वाटले की, यापुढे आपल्या साहाय्यासाठी कुणीच येणार नाही. आपल्यालाच संघटित होऊन भीषण आपत्काळाला तोंड द्यायचे आहे. त्यासाठी समितीने सांगितल्याप्रमाणे निश्चितच प्रयत्न करू.
२. श्री. वासू ठाकूर, राजस्थान – महिला आणि युवती यांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे, ही काळाची आवश्यकता आहे. हे प्रशिक्षण मीही शिकेन आणि इतरांनाही प्रोत्साहित करीन. व्याख्यान आयोजन केल्याविषयी आभारी आहे.
३. श्री. लोकेश, राजस्थान – आताची गंभीर परिस्थिती पाहून ‘आपण आता जागे होऊन काहीतरी केलेच पाहिजे’, असे वाटू लागले आहे. हिंदु जनजागृती समितीने अत्यंत चांगला प्रयत्न केला आहे.