नगर येथील अल्पवयीन मुलीला धर्मांधाने पळवून नेल्याचे प्रकरण
|

नगर, २९ ऑगस्ट – माझी १५ वर्षीय मुलगी १४ ऑगस्ट या दिवशी घरातून बेपत्ता झाली आहे. आम्ही याविषयी रीतसर तक्रार सोनई पोलीस ठाणे येथे १५ ऑगस्ट या दिवशी केली परंतु ५-६ दिवस झाले, तरी आम्हाला पोलीस ठाण्यामधून कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. तरी आम्हाला आमची मुलगी परत मिळावी, अशा आशयाचे निवेदन पीडितेची आई अनुराधा आढाव यांनी नगर पोलीस ठाण्यात दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,
१. आम्ही आमच्या गावात चौकशी केली असता आमच्या मुलीला लतीफ शेख यांचा मुलगा सुरज शेख याने फूस लावून पळवून नेल्याचे समजले.
२. आम्ही लतीफ शेख यांच्या घरी विचारपूस करण्यासाठी गेलो असता त्यांनी आमच्या समवेत भांडण केले आणि आम्हाला धमकी दिली, ‘आम्ही पोलीस ठाणे ‘मॅनेज’ केले आहे, काय करायचे ते करा. आमचे कुणीही काहीही करू शकत नाही.’
३. लतीफ शेख आणि त्यांच्या ३ मुलांनी माझ्या मुलीवर अत्याचार केले असतील किंवा तिला विकूनही टाकले असेल. कृपया आपण तातडीने कारवाई करावी. आमची मुलगी आम्हाला परत मिळवून द्यावी.
४. ‘माझ्या मुलीला पळवून नेण्यात त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा सहभाग आहे’, असे आम्हाला वाटते. माझ्या मुलीने घरातून जातांना ७० ते ८० सहस्र रुपये आणि ३ तोळे सोने नेले आहे. आमच्या मुलीचे काही बरेवाईट झाले, तर त्यात कुणाला उत्तरदायी धरायचे ? आम्हाला आशा आहे की, महाराष्ट्र पोलीस आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आमची मुलगी शोधण्यास साहाय्य करतील.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद