कोरोना लस घेण्यास नकार देणारा भारतीय वायूदलाचा कर्मचारी बडतर्फ

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यास नकार देणार्‍या एका कर्मचार्‍याला भारतीय वायूदलाने नोकरीतून काढले आहे, अशी माहिती केंद्र सरकारने गुजरात  उच्च न्यायालयात दिली. सेवेच्या नियमांनुसार लस घेणे कर्मचार्‍यांसाठी अनिवार्य करण्यात आल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

देशभरात अशा ९ कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या सर्व कर्मचार्‍यांनी कोरोना लस घेण्यास नकार दिला होता. यांतील एका कर्मचार्‍याने या नोटिसीचे उत्तर दिले नव्हते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. या कर्मचार्‍याचे नाव किंवा आणखी माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही.