समाजातील वाढती कामांधता ही समाजावर साधनेद्वारे नीतीमत्तेचे संस्कार न केल्याचा परिणाम !

पणजी, ११ ऑगस्ट (वार्ता.) – पर्ये येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणार्या दोडामार्ग येथील अक्षय वसंत नाईक (वय ३१ वर्षे) याला १० ऑगस्ट या दिवशी वाळपई पोलिसांनी अटक केली. वाळपई पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या अपहरण करणे आणि बलात्कार करणे यांच्याशी संबंधित कलमांनुसार, तसेच बाल संरक्षण कायदा आणि ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित आरोपीने पर्ये येथून त्या अल्पवयीन मुलीला पळवून स्वतःच्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला, असे या तक्रारीत म्हटले आहे. यासंबंधी पुढील पोलीस चौकशी चालू आहे.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !