तुमकुरू (कर्नाटक) मधील घटना
|

तुमकुरू (कर्नाटक) – जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाने मदरशातील शिक्षकाला ११ वर्षे कारावास आणि ३० सहस्र रुपये दंड ठोठावला आहे. यासमवेतच न्यायालयाने ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा’ला पीडित मुलाला ५ लाख रुपये हानीभरपाई देण्याचा आदेशही दिला आहे.
Karnataka: Madarsa teacher sent to 11 years of rigorous imprisonment for sodomising a minor boy in 2015https://t.co/jMaDmjOtz9
— OpIndia.com (@OpIndia_com) August 1, 2021
मिळालेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेशमध्ये रहाणारा मुशर्रफ कर्नाटकच्या तुमकुरू येथे एका मदरशात शिक्षक होता. त्याने १७ एप्रिल २०१५ या दिवशी एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केले होते. मुलाची आई त्याला भेटण्यासाठी मदरशामध्ये गेली असता त्याने आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला. आईने या प्रकरणाची तक्रार केल्यावर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी त्याच्या विरोधात ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत प्रकरण नोंद करण्यात आले होते.
मुशर्रफला कन्नड येत नसल्याने त्याने रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी मुलाला तुमकुरू रेल्वे स्थानकावर नेले होते. नंतर तेथेच एका हॉटेलमध्ये रात्री त्याने मुलाशी कुकर्म केले होते.
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !