|
पाटलीपुत्र (बिहार) – राज्यातील शिक्षण मंडळाच्या ‘स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’च्या (राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या) इयत्ता ५ वीच्या ‘ब्लॉसम पार्ट-४’ या क्रमिक पुस्तकात मुलांच्या मनावर येशू ख्रिस्ताचा प्रभाव पडेल, अशा आशयाचा धडा देण्यात आला आहे. ‘जिझस टू सुपर’ या मथळ्याखालील हा धडा आहे. यामध्ये एक कुटुंब येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी कसे आतुर असते, येशूचे कृपाछत्र मिळावे याकरता त्या कुटुंबाचा प्रयत्न कसा असतो, अशी काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे.