अपंग किंवा विकलांग यांना ‘दिव्यांग’ म्हणणे आध्यात्मिदृष्ट्या अयोग्य !

दिव्यांग शब्दाचा अर्थ ‘दैवी किंवा डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म अंग’

‘केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्वत्र अपंग, विकलांग यांना ‘दिव्यांग’ असा शब्दप्रयोग प्रचलित करण्यात आला आहे.  अध्यात्माच्या दृष्टीने दिव्यांगाचा अर्थ पाहिल्यास ‘दिव्य + अंग = दिव्यांग’ होय. दिव्य म्हणजे दैवी किंवा सूक्ष्म (म्हणजे लौकिकदृष्ट्या डोळ्यांना न दिसणारे) होय.  यावरून दिव्यांग या शब्दाचा अर्थ ‘दैवी किंवा डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म अंग’ असाही होतो. त्यामुळे अपंग किंवा विकलांग या शब्दांसाठी दिव्यांग शब्द वापरणे आध्यात्मिकदृष्ट्या अयोग्य ठरते.’