संगम माहुली येथे हुल्लड तरुणांनी ‘स्टंट’बाजी करत पुराच्या पाण्यात घेतल्या उड्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा – शहराला लागूनच असलेल्या संगम माहुली येथील कृष्णा-वेण्णाच्या संगमावर पाणी दुथडी भरून वहात आहे. या पुराच्या पाण्यात काही हुल्लड तरुण ‘स्टंट’ करत पाण्यात उड्या घेत होते.

सातारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील कृष्णा, कोयना, वेण्णा, तारळी आदी नद्यांना पूर आला आहे. संगम माहुली येथील कृष्णा आणि वेण्णा नदी संगमावर असलेली छत्रपती शाहू महाराज यांची समाधी पाण्याखाली गेली असून कैलास स्मशानभूमीचा खालचा टप्पा पूर्ण पाण्यात गेला. सातारावासियांनी मात्र पुराचे पाणी पहाण्यासाठी संगम माहुली येथे गर्दी केली. काही नागरिक स्वतःचे छायाचित्र काढण्यात (सेल्फी) दंग होते, तर काही जण चित्रीकरण करत होते. काही हुल्लड तरुण पुराच्या पाण्यात पोहत होते. (अशांचा अतीउत्साहच त्यांच्या जिवावर बेततो. अशांना आवर घालण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलायला हवीत ! – संपादक)