जयपूर (राजस्थान) येथील हिंदु विवाहितेचे धर्मांधाकडून बलात्कार करून धर्मांतर

पोलिसांकडून तक्रार नोंदवण्यास नकार !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार शिक्षा करण्याची मागणी मुसलमान कधी करत नाहीत, हे लक्षात घ्या !

तक्रार नोंदवून घेण्यास नकार देणार्‍या पोलिसांवरही गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाका !

 

जयपूर (राजस्थान) – येथील प्रतापनगरमध्ये रहाणार्‍या २५ वर्षीय विवाहित हिंदु महिलेवर शाहिद नावाच्या धर्मांधाने बलात्कार करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या महिलेला तिचा पती मद्यपान केल्यानंतर मारहाण करत होता. त्यामुळे त्यांच्या शेजारी रहाणार्‍या शाहिद याने वर्ष २०१६ मध्ये तिला चांगली नोकरी देण्याचे आमीष दाखवून तिला आणि तिच्या लहान मुलाला काश्मीर येथे नेले. तेथे तिच्या लहान मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे धर्मांतर केले.

धर्मांतरानंतर या महिलेचे नाव सोनम आणि मुलाचे नाव सरफराज ठेवण्यात आले. ४ वर्षांनंतर ही महिला शाहिद याच्या तावडीतून निसटली आणि तिने पोलिसांत त्याच्या विरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्यावर तिने न्यायालयात खटला प्रविष्ट केला. त्यानंतर न्यायालयाने शाहिद, आमिर हुसैन, फिरदौस, बिस्मिल्लाह आणि काझी या ५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला. महिलेची तक्रार नोंदवून न घेतल्याच्या प्रकरणी पोलीस ठाण्याचे अंमलदार श्रीमोहन मीणा यांची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलिसांनी म्हटले की, ही महिला दीड वर्षांपूर्वीही पोलीस ठाण्यात आली होती. त्या वेळी शाहिद याने तिची समजूत काढल्यावर ती परत गेली होती.