मध्यप्रदेशमध्ये धर्मांधाच्या अत्याचाराला कंटाळून त्याच्याशी निकाह केलेल्या हिंदु कुटुंबातील युवतीची आत्महत्या !

हिंदु तरुणींना धर्मशिक्षण नसल्याने त्या धर्मांधासमवेत विवाह करतात ! विवाहानंतर धर्मांधांचे खरे स्वरूप दिसून आल्यावर युवतींवर आत्महत्या करण्याची पाळी येते !

मध्यप्रदेश – मध्यप्रदेशमध्ये वासिम नावाच्या धर्मांधाच्या अत्याचाराला कंटाळून त्याच्याशी निकाह केलेल्या हिंदु कुटुंबातील एका युवतीने आत्महत्या केली आहे. आर्थिकदृष्ट्या संपन्न जैन परिवारातील ही युवती वासिम नावाच्या धर्मांधाच्या प्रेमात पडली. १८ वर्षांची झाल्यानंतर ती वासिमसमवेत पळून गेली. कालांतराने तिने घरी संपर्क करून ‘मी स्वेच्छेने धर्म पालटला आहे आणि मी वासिमसमवेत निकाह केला आहे. तो माझा चांगला सांभाळ करत आहे’, असे सांगितले. त्यानंतर काही वर्षांनी युवतीच्या भावाने तिच्याशी संपर्क केला असता, त्याला वासिमची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे समजले. त्यामुळे त्याने बहिणीला बाळंतपणासाठी २ लाख रुपये पाठवले. पुढे दळणवळण बंदीमुळे भावाचा पुन्हा तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर काही दिवसांनी त्या युवतीचा मृतदेह सापडल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळाली. युवतीने वासिमच्या अत्याचाराला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे समजते. युवतीच्या कुटुंबियांनी तिच्यावर हिंदु धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे ठरवल्यावर वासिमच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला; मात्र पोलिसांनी ऐकून न घेतल्याने तिच्यावर हिंदु धर्मानुसार अंत्यसंस्कार केले.