श्रीनगर येथे २ आतंकवादी ठार, तर २ सैनिक घायाळ

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – श्रीनगरच्या दानमार भागात सुरक्षादलाने लष्कर-ए-तोयबाच्या २ आतंकवाद्यांना ठार केले. इरफान आणि बिलाल अहमद अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एके ४७ रायफल आणि ४ ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. हे दोन्ही आतंकवादी स्थानिक असल्याचे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले. या चकमकीत २ सैनिक घायाळ झाले.