पूजाविधी भावपूर्ण केला, तर त्यामुळे चैतन्य निर्माण होऊन त्याचा लाभ समाजाला होतो. रोबोट पूजा करील; मात्र ती भावपूर्ण असेल का ? प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ‘रोबोट’ पुजारी निर्माण करू शकतो; मात्र त्याच्यात भाव, ईश्वराप्रती शरणागती हे दैवी गुण कसे निर्माण करणार ? विज्ञानाची मर्यादा यातून दिसून येते !
टोकीयो (जपान) – जपानच्या क्योटो शहरात असलेल्या ४०० वर्षे प्राचीन कोदाइजी बौद्ध मंदिरात एकही पुजारी नाही. त्याऐवजी येथे रोबोटद्वारे धार्मिक विधी केले जातात. विशेष म्हणजे ‘अँड्रॉयड’ नामक हा रोबोट केवळ देवांची पूजाच नव्हे, तर भाविकांना धार्मिक ज्ञानदेखील देतो आणि त्यांच्या शंकांचे निरसनही करतो. हा रोबोट बौद्ध धर्मातील पालटत्या सूत्राप्रमाणे स्वतःच्या ज्ञानात भर घालत आहे. त्यामुळे भाविकांनी विचारलेल्या प्रश्नांना तो योग्य उत्तर देतो. ‘हा ‘रोबोट’ पुजारी कधीही मरण पावणार नाही आणि पालटत्या काळाप्रमाणे तो स्वत: ला विकसित करणार’, असे सांगितले जात आहे. ६ फूट उंच असलेला ‘अँड्रॉयड’ हा मानवाप्रमाणे दिसतो. अँड्रॉयड सिलिकॉनपासून बनवण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा तोंडवळा, हात, खांदे अगदी मानवाप्रमाणे भासतात. अँड्रॉयडला बनवण्यासाठी १० लाख डॉलर रुपये खर्च करण्यात आले आहेत.
इस्रायल आणि इराण यांच्यात काही काळासाठी एकमेकांवर आक्रमण न करण्यावर सहमती ! – Donald Trump
H-1B Visa : ट्रम्प यांनी लादलेले विदेशी कामगारांसाठीच्या ‘एच्-१बी व्हिसा’वरील शुल्क केंद्रीय न्यायालयाकडून रहित !
भारताने प्रथमच क्षेपणास्त्रांवर १२ ‘सक्रीय’ अण्वस्त्रे केली तैनात ! – SIPRI Report
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !
भारत, रशिया आणि चीन यांच्यातील दृढ संबंध जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ! – China
अखेर तुळजाभवानी देवीचा मुकुट सापडला; दोन जण जेरबंद