१ आनंदी
‘कुंभारकाकू नेहमी आनंदी असतात. त्यांचा तोंडवळा हसतमुख असतो.’ – सौ. सुलोचना जाधव आणि सौ. स्मिता नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल
२. ‘कुंभारकाकू मितभाषी आहेत. त्या सेवेसंदर्भातही आवश्यक तेवढेच बोलतात.’ – सौ. सुषमा कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल
३. प्रेमळ : ‘त्या केव्हाही भेटल्यावर ‘नमस्कार !’ असे म्हणतात आणि प्रेमाने विचारपूस करतात.’ – सौ. सुलोचना जाधव
४. कौटुंबिक दायित्व निभावणे : काकूंना सासरी, माहेरी आणि लग्न झालेल्या मुलीकडे त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी जावे लागते. तेथेही त्या साधना म्हणूनच सर्व करतात.’
– सौ. सुषमा कुलकर्णी
५. स्वीकारण्याची वृत्ती
‘काकूंना मणक्याचा त्रास आहे. त्यांचे शस्त्रकर्म झाले आहे, तरी त्या स्वतःच्या दुखण्याविषयी कधीही सांगत नाहीत. त्यांच्या मुलीलाही मणक्याचा त्रास आहे. त्या मुलीच्या दुखण्याविषयीही काही सांगत नाहीत.
६. सेवाभाव
अ. त्या सकाळी १० वाजता आश्रमात सेवेला येतात. त्या १० ते १२.३० वाजेपर्यंत सेवा करतात. त्या सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची कोणतीही सेवा करण्याची सिद्धता असते.’
– सौ. स्मिता नाणोसकर
आ. ‘सेवा झाल्यावर त्या सेवेचे पटल आवरून घरी जातात.’ – सौ. सुषमा कुलकर्णी
७. तत्त्वनिष्ठ
त्या आमच्याकडून झालेल्या चुका तत्त्वनिष्ठतेने सांगतात. ‘साधिका मुलींप्रमाणे आहेत,’ असा त्यांचा भाव आहे. त्यांनी सांगितलेली चूक अंतर्मनात जाऊन ‘चुका टाळून सेवा शांततेने कशी करायची’, हे लक्षात येते.’ – कु. मनीषा पोशे, सनातन आश्रम, देवद, पनवेल
८. काकूंमध्ये वक्तशीरपणा, सेवेची तळमळ, व्यवस्थितपणा, असे अनेक गुण आहेत. मला त्यांच्याकडून ‘सकारात्मकता आणि प्रत्येक प्रसंगात स्थिर रहाणे’, हे गुण शिकायला मिळाले.’
– श्रीमती अनुराधा माळगावकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल (डिसेंबर २०१८)