देवद (पनवेल) येथील श्री. नेताजी तुळजाराम जाधव (वय ७९ वर्षे) यांच्याविषयी साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नेताजी तुळजाराम जाधव (वय ७९ वर्षे) यांच्याविषयी साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. नेताजी जाधव

१. मितभाषी

‘जाधवआजोबा मितभाषी आहेत. मी त्यांना आजपर्यंत कुणाशीही अनावश्यक बोलतांना पाहिले नाही. ते पत्नीशीही अल्प बोलतात.’

– सौ. सुषमा कुलकर्णी

२. सेवेची तळमळ

‘त्यांना गुडघेदुखीचा तीव्र त्रास असूनही ते जलद गतीने सेवा करतात. ते वयस्कर असूनही झोकून देऊन सेवा करतात.’ – सौ. स्मिता नाणोसकर

३. मायेची आसक्ती नसणे

‘त्यांना मायेची आसक्ती नाही. त्यांचे घरी जाण्याचे प्रमाणही पुष्कळ अल्प आहे. ते घरी गेले, तरी एका आठवड्यात आश्रमात परत येतात. ‘त्यांनी आश्रमजीवन अगदी सहजतेने स्वीकारले आहे’, असे वाटते.’ – सौ. सुषमा कुलकर्णी

४. अनुसंधानात असणे

‘आजोबांचा नामजप आतून चालू आहे’, असे वाटते. त्यांच्या सहवासात मला सत्मध्ये असल्यासारखे वाटते. प.पू. गुरुदेवांनी असे साधक आम्हाला दिले, त्यासाठी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’ – कु. मनीषा पोशे

५. ‘जाधवआजोबा बोलत असतांना त्यांच्यातील ‘साधेपणा, नम्रता आणि अहं अल्प असणे’, या गुणांची जाणीव होते. त्यांचा माझ्याशी फारसा संपर्क नाही, तरी त्यांच्यातील ‘प्रेमळपणा आणि परिस्थिती स्वीकारणे’ हे गुण मला भावतात.’ – श्रीमती अनुराधा माळगावकर

(डिसेंबर २०१८)