
यवतमाळ, २७ जून (वार्ता.) – आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने २१ जूनला ‘अखिल भारतीय योग महासंघा’ने जागतिक स्तरावर ‘ग्रुप इव्हेंट’ आयोजित केले होते. त्यात साप्ताहिक ‘स्वराज्य गर्जना’चे संपादक क्रांतीकुमार शैलेश अलोने यांनी चक्रासनामध्ये २ मिनिटे आणि उष्ट्रासनामध्ये ४ मिनिटे राहून आपले नाव ‘वर्ल्ड बुक ऑफ योगा रेकॉर्ड’मध्ये नोंदवले. यशाचे श्रेय त्यांनी वडील शैलेश अलोने, आई सौ. सुवर्णा अलोने, बहीण ज्वाला अलोने यांना दिले. त्यांना ‘श्री. नंदानु योगकेंद्र यवतमाळ’चे संचालक श्री. प्रेमदास पकडे यांचे मार्गदर्शन लाभले. क्रांतीकुमार हे इंदिरा महाविद्यालय, कळंब येथे विज्ञान शाखेच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहेत.
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !