|
कारवाई करण्यास नकार देणार्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

बिजनौर (उत्तरप्रदेश) – येथील हल्दौरामधील स्योहारा गावात रहाणार्या महिलेने तिला एका धर्मांध युवकाने नोकरीचे आमीष दाखवून त्याच्या ३ साथीदारांसह तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या आरोपींच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असाही आरोप तिने केला आहे. हिंदु जागरण मंच या संघटनेने या घटनेला ‘लव्ह जिहाद’ म्हटले आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे याची तक्रार केली आहे.
१. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जामध्ये या महिलेने म्हटले आहे की, ती मुंबईत घरकाम करत होती. दळणवळण बंदीमुळे काम बंद झाल्याने तेथे केशकर्तनालयात काम करणार्या बिजनौर येथील तरुणाने नोकरी देण्याचे आमीष दाखवून बिजनौर येथे आणले. तेथे त्याने त्याच्या साथीदारांसह अनेकवेळा बलात्कार केला.
२. दुसरीकडे स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रमुखाचा दावा आहे की, ही घटना मुंबईची आहे. तेथून या तरुणाने तिला बिजनौर येथे आणले. त्यामुळे गुन्हा तेथे झाला आहे. (गुन्हा कुठेही घडला, तरी व्यक्ती देशातील कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू शकतेे, असा कायदा असतांना पोलीस अशा प्रकारचे उत्तर कसे देतात ? – संपादक)
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’