मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे दोन दुचाकींवरून नेण्यात येणारे १ क्विंटल गोमांस जप्त

उत्तरप्रदेशात गोहत्या बंदी असतांनाही गोहत्या होऊन गोमांसाचे वितरण होते, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! भारतातील ज्या राज्यांत गोहत्या बंदी आहे, तेथे सर्रास गोहत्या होऊन गोमांसाचे वितरण होत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

मैनपुरी (उत्तरप्रदेश) – येथे बकरी चोरांचा शोध घेत असतांना २ दुचाकींवरून येणार्‍यांना रोखले असता ते दुचाकी सोडून पळून गेले. या दुचाकींवरील गोण्यांमध्ये गोमांस असल्याचे उघडकीस आले. या गोण्यांमध्ये एक क्विंटल गोमांस होते. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

या घटनेसंदर्भात हिंदु जागरण मंचचे जिल्हाध्यक्ष जय प्रकाश चौहान यांनी आरोप केला, ‘गावकर्‍यांनी दुचाकीवरील तरुणांना पकडले होते; मात्र पोलिसांनी त्यांना सोडून देण्यास सांगितले.’ पोलिसांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. (हिंदु जागरण मंचने केलेल्या आरोपाची चौकशीही झाली पाहिजे ! – संपादक)