पाकमध्ये जिहादी आतंकवादी हाफिज सईद याच्या घराबाहेरील स्फोटात २ ठार, तर १७ जण घायाळ

‘या स्फोटामागे सनातन किंवा अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा हात आहे’, असा आरोप भारतातील पाकप्रेमी आणि निधर्मीवादी यांनी केला, तर आश्‍चर्य वाटू नये !

जिहादी आतंकवादी हाफिज सईद याच्या घराबाहेरील स्फोट

लाहोर (पाकिस्तान) – पाकपुरस्कृत आतंकवादी संघटना लश्कर-ए-तोबयाचा प्रमुख आणि मुंबईतील आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याच्या लाहोरामधील घराबाहेर झालेल्या स्फोटात २ जण ठार झाले, तर १७ जण घायाळ झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतीदक्षता विभागामध्ये भरती करण्यात आले आहे. लाहोर शहरातील जोहार टाऊन भागात असलेल्या अकबर चौकात हाफिज सईद याचे घर आहे. तेथे हा स्फोट झाला. पोलिसांकडून स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. हा स्फोट बॉम्बमुळे झाला असल्याचे सांगितले जात असले, तरी पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. ‘घटनेचे अन्वेषण केल्यानंतर स्फोटाच्या कारणाविषयी सांगू शकू’, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका भयंकर होता की, परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या आहेत, तर एक इमारत पूर्णपणे कोसळली आहे. जवळपासच्या गाड्यांचीही मोठी हानी झाली आहे. येथील गॅस पाईपलाईन फुटली कि गॅस सिलिंडरचा स्फोट झाला, अशी चर्चाही चालू आहे; पण हाफिज सईदच्या घराजवळ स्फोट झाल्याने यामागे मोठे षड्यंत्र असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच स्फोटाच्या वेळी हाफिज सईद घरात होता कि नाही, याचीही काही माहिती अद्याप समोर आलेली नाही.  घटनास्थळावर बॉम्बशोधक पथकाकडूनही अन्वेषण चालू करण्यात आले आहे.