
सोलापूर, १८ जून (वार्ता.) – येथील दत्त चौकातील गणपति घाटावरील कुंडात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती कुंडातील पाणी न्यून झाल्याने उघड्या पडल्या होत्या. त्यामुळे उघड्यावर पडलेल्या गणेशमूर्तींची विटंबना होण्याची शक्यता होती. ही विटंबना रोखण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांनी तेथे तात्काळ धाव घेऊन या मूर्ती बाहेर काढल्या. या मूर्ती महापालिकेच्या वाहनातून सोलापूरच्या जवळच असलेल्या हिप्परगा तलाव येथे विसर्जित केल्या. या वेळी सोलापूर येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी उपस्थित होते.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !