पणजी, १२ जून (वार्ता.) – हवामान विभागाने १४ जून या दिवशी गोव्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने पूर्वी १४ जूनसाठी ‘ऑरेंज कलर’ चेतावणी दिली होती आणि आता यामध्ये पालट करून ‘रेड कलर’ चेतावणी देण्यात आली आहे. १२ आणि १३ जून, तसेच १५ आणि १६ जून या दिवशी ‘ऑरेंज कलर’ चेतावणी कायम रहाणार आहे. या काळात सोसाट्याच्या वार्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, तसेच मासेमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.