ठाणे येथील भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक पू. डॉ. शिवकुमार ओझा यांनी लिहिलेल्या ग्रंथमालिकेस प्रारंभ !
पू. डॉ. शिवकुमार ओझा (वय ८७ वर्षे) ‘आयआयटी, मुंबई’ येथे एयरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये पीएच्.डी. प्राप्त प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय दायित्वे सांभाळली, तसेच विदेशातही अध्यापनाचे कार्य केले. सेवानिवृत्तीनंतर ‘भारतीय संस्कृती’ जाणून घेण्याविषयी त्यांची विशेष रुची वाढली. त्यानंतर भारतीय संस्कृती हेच त्यांचे अध्ययन आणि अध्यापन यांचे क्षेत्र बनले. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ‘भारतीय संस्कृती’ हा विषय ‘आयआयटी, मुंबई’मध्ये शिकवला जाऊ लागला, तसेच या विषयावर स्वतः अध्यापन करून त्यांनी तेथील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी रुची निर्माण केली. पू. ओझाजी जितका काळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होते, तितक्या कालावधीत ‘भारतीय संस्कृती’ हा विषय शिकणार्यांची संख्या प्रतिवर्षी वाढतच होती.
भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक अन् ज्ञानमार्गानुसार साधना करून भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी समर्पितभावाने अलौकिक कार्य करणारे ठाणे येथील पू. डॉ. शिवकुमार ओझा यांनी लिहिलेल्या ग्रंथांमधील निवडक लिखाणाला दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रत्येक रविवारी प्रसिद्धी देण्यात येणार आहे. पू. डॉ. ओझा यांनी भारतीय संस्कृती, अध्यात्म, संस्कृत भाषा आदी विषयांवर ११ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. ‘भारतीय संस्कृती महान आणि विलक्षण’ या नावाचा त्यांचा ६६० पृष्ठांचा ग्रंथ सनातन वैदिक संस्कृतीचा साररूपी ग्रंथ आहे. हे ग्रंथ हिंदी भाषेत आहेत. त्यांचे मराठीत भाषांतर करून ते प्रसिद्ध करण्यात येत आहेत. ‘पू. डॉ. शिवकुमार ओझा यांनी लिहिलेल्या कोणत्या ग्रंथात कोणत्या विषयाचा समावेश आहे ?’, याविषयीची थोडक्यात माहिती आमच्या वाचकांसाठी देत आहोत.
१. ‘सर्वोत्तम शिक्षा क्या है ?’ या ग्रंथात ‘आधुनिक शिक्षणामुळे माणूस भौतिक सुखांकडे आसक्त झाल्याने काय हानी झाली ? ‘शिक्षण’ याचा अर्थ, इंग्रजी भाषेतील आधुनिक शिक्षण आणि त्यातील दोष, शिक्षणात विविध प्रकारच्या प्रमाणांना आधार असणे का आवश्यक आहे ? आणि त्यातून होणारे लाभ, शिक्षणात धर्म असणे का आवश्यक आहे ? आधुनिक शिक्षणामुळे युवकांची झालेली वैचारिक हानी’ अशा विविध विषयांचा ऊहापोह करण्यात आला आहे.
२. ‘भारतीय संस्कृती समझना अनिवार्य क्यो ?’ या ग्रंथात ‘भारतीय संस्कृती म्हणजे काय ? भारतीय संस्कृतीचा केंद्रबिंदू कोणता ? ती जाणून घेतल्याने कोणते लाभ होतात ? भारतीय संस्कृतीने संस्कृत भाषेला अधिक महत्त्व का दिले आहे ? भारतीय संस्कृती धर्माचे स्वरूप कशा प्रकारे समजावून सांगते ? या संस्कृतीचे पालन केल्याने जीवनातील ध्येय कशा प्रकारे योग्यरित्या निवडता येते ? कर्माचे विज्ञान कशा प्रकारे समजून सांगते ? अंतःकरण शुद्धीचे कोणते उपाय संस्कृतीत आहेत ?’, यांसह अनेक विषयांचा ऊहापोह करण्यात आला असून ‘भौतिकवादी समाजाची स्थिती आणि भारतीय संस्कृती’ यांतील भेद स्पष्ट करून दाखवण्यात आला आहे.
३. ‘भारतीय संस्कृति : केंद्रबिंदू एवं तत्त्व क्या है ?’ या ग्रंथात ‘पूजा-पाठ करणे, ध्यान, योग, प्राणायाम, मंत्र-जप, तंत्र, आध्यात्मिक प्रवचन हे सर्व नेमके कशासाठी आहेत ? या सर्वांचा केंद्रबिंदू कोणता ? भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असण्यामागील नेमकी कारणे, भारतीय संस्कृती कशा प्रकारे जीवनाला स्थिरता देते ? केवळ भौतिक ज्ञान प्राप्त केल्याने होणारे तोटे’, यांसह अन्य विषयांचा परामर्ष करण्यात आला आहे.
४. ‘संस्कृत-हिन्दी महत्त्वपूर्ण क्यों, प्रचार कैसे हो ?’ या ग्रंथात ‘संस्कृत भाषेतील विशेष गुण, या भाषेतील शब्दभांडार; हिंदी, तसेच अन्य भाषा यांचा प्रचार वाढण्यासाठीचे विविध उपाय, शुद्ध उच्चारांचे महत्त्व’, यांसह अन्य विषयांचा ऊहापोह करण्यात आला आहे.
पू. डॉ. ओझा यांचे हे ग्रंथ म्हणजे धर्म, संस्कृती आणि अध्यात्म यांच्या अभ्यासकांसाठी देवाने दिलेली एक अनमोल देणगी आहे अन् हिंदु समाजासाठी तो एक अमूल्य ठेवा आहे. या ग्रंथांमधील ज्ञान म्हणजे हिंदु धर्मातील सर्व वाङ्मयाचे सार आहे; म्हणून या ग्रंथांना संदर्भ ग्रंथ म्हणणेच उचित ठरेल. शास्त्रीय प्रमाणासहित प्रसृत झालेले हे ज्ञान ‘सनातन प्रभात’मध्ये अंशरूपाने प्रकाशित होणार असले, तरी पू. डॉ. ओझा यांच्या ग्रंथांमध्ये हे ज्ञान सविस्तर अभ्यासण्याची संधी वाचकांना आहे. या संधीचा वाचकांनी लाभ घ्यावा.
वाचकांना विनंती !केवळ हिंदु समाज नव्हे, तर जगभरात सर्वांना अध्यात्माची शिकवण देण्यासाठी पू. डॉ. ओझा यांनी लिहिलेले ग्रंथ विविध भाषांत उपलब्ध होणे आवश्यक आहे. पू. डॉ. ओझाजी यांचे हे ग्रंथ सध्या हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये त्यांचे भाषांतर करण्यास इच्छुक असणार्या वाचकांनी संपर्क साधावा. सौ. भाग्यश्री सावंत : भ्रमणभाष क्र. ७०५८८८५६१० संगणकीय पत्ता : sanatan.sanstha२०२५@gmail.com पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ’सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा पिन – ४०३४०१ |
पू. डॉ. ओझा यांच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी भेट द्या : SanatanShop.com
पू. डॉ. ओझा यांच्या ग्रंथांमधील निवडक लिखाणाची मालिका वाचा पुढच्या रविवारपासून !