आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालूच राहील ! – विनायक मेटे, शिवसंग्राम संघटना प्रमुख

बीड येथे मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे आयोजन

विनायक मेटे

बीड – मराठ्यांना वार्‍यावर सोडू नका. ही लढाई गरीब आणि श्रीमंत यांच्यातील नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संघर्ष चालूच राहील, अशी चेतावणी शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांनी दिली. येथे मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे त्यागपत्र घ्या !, अशी मागणीही शासनाकडे केली आहे.

या वेळी मेटे म्हणाले की, ५ जुलैपर्यंत मागण्या मान्य न केल्यास पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही. मराठा आमदारांनी सरकारकडून मागण्या मान्य करून घ्याव्यात, अशी विनंतीही त्यांनी लोकप्रतिनिधींना या वेळी केली.