दळणवळण बंदीमुळे पी.एम्.पी. बंद असूनही दरमहा ४० कोटींचा व्यय !

पुणे – दळणवळण बंदीमुळे  पी.एम्.पी. बससेवा बंद असल्याने अंदाजे २ सहस्र २०० बस जागेवर उभ्या आहेत. मात्र त्यासाठी पीएमपीला दरमहा ४० कोटी रुपये  व्यय करावा लागत आहे. या बसची बॅटरी खराब होऊ नये यासाठी त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी ५०० कर्मचारी नेमले नेमले आहेत. तसेच बंद बस मागे पुढेही कराव्या लागत आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १२६ बस चालू असून ३०० वाहक-चालक कार्यरत आहेत. चालू असलेल्या बससाठी लागणारे इंधन, बस गाड्यांची देखभाल दुरुस्ती आणि  पी.एम्.पी.मध्ये असणाऱ्या अनुमाने १० सहस्र कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील ३४ कोटी व्यय करणे क्रमप्राप्त असून शक्य त्या ठिकाणी खर्चात कपात करण्यात येत असल्याचे  पी.एम्.पी.चे मुख्य अभियंता सुनील बोरसे यांनी सांगितले.