
सातारा, ४ जून (वार्ता.) – विदेशात शिक्षण आणि नोकरी यांसाठी येथील युवकांनी ‘ऑनलाईन’ नोंदणी करून तेथील प्रवेश तसेच नोकरी निश्चित केली आहे. सध्या राज्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरण बंद आहे. त्यातच विदेशी दूतांनी लसीकरण केल्याशिवाय विदेशात प्रवेश निषिद्ध केला आहे. याचा फटका जिल्ह्यातील ४०० युवकांना बसला आहे. त्यामुळे वेळ निघुन जाण्याअगोदर निर्णय न झाल्यास जिल्ह्यातील युवकांचे भवितव्य अंध:कारमय होऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
‘ऑनलाईन’ नोंदणी केलेल्या युवकांना लसीकरण करणे आवश्यक करण्यात आले असून त्यातही ‘कोव्हिशिल्ड’चीच लस घेतलेली असावी, असेही बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे अशा युवकांचा लसीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश युवकांना ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये विदेशात जावे लागणार आहे. जर लस मिळाली नाही, तसेच प्रशासनाने तातडीने उपाययोजना काढली नाही, तर युवकांना विदेशात जाता येणार नाही.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन