नगर – ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात बंदी घालावी, असे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील पोलीस निरीक्षक आणि जामखेडचे तहसीलदार यांना देण्यात आले. ‘या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी. गिरीश कुबेर यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवावा, अन्यथा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या पुस्तकाचा तीव्र निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरेल’, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली.