मुलींना छेडणार्‍या मुलाचे नाव हरि, तर चांगले काम करणारा ‘अब्दुल’ !

एन्.सी.ई.आर्.टी.चा गेली १४ वर्षे हिंदुद्वेष चालू !

  • ‘केंद्रात काँग्रेसचे सरकार नसतांनाही अशा प्रकारचा हिंदुद्वेष अद्याप चालू कसा ?’ असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात आल्याच आश्‍चर्य वाटू नये !
  • केंद्र सरकारने तात्काळ याची नोंद घेत यात पालट करावेत, असेच हिंदूंना वाटते !

नवी देहली – एन्.सी.ई.आर्.टी.च्या ५ वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील मेरीगोल्डच्या युनिट ८ मधील ‘द लिटिल बुली’ या धड्यामधून जाणीवपूर्वक हिंदूंच्या देवतेचा अवमान करण्याचा प्रयत्न गेली १४ वर्षे होत आहे. तसेच अन्य एका पुस्तकात ‘अब्दुल’ नावाच्या मुलाला चांगले काम करणारा दाखवण्यात आले आहे.

१. ‘अ‍ॅडवायजरी कमेटी फॉर टेक्स्ट बुक अ‍ॅट द प्रायमरी लेवल’च्या अध्यक्षा अनिता रामपाल यांच्या नेतृत्वाखाली वर्ष २००७ मध्ये हे पुस्तक सिद्ध करण्यात आले आहे. यात भगवान विष्णूच्या ‘हरि’ नावाचा वापर करून अवमान करण्यात आला आहे. ‘द लिटिल बुली’ या धड्यातील पात्राचे नाव ‘हरि’ असून तो मुलींना चिडवतो, त्यांच्या वेण्या खेचतो, त्यांच्यावर दादागिरी करतो. त्यामुळे मुले त्याला घाबरतात, त्याचा द्वेष करतात, असे दाखवण्यात आले आहे. शेवटी एक खेकडा त्याला चावतो आणि धडा शिकवतो, असे सांगितले आहे.

२. ब्रिटनच्या एनिड ब्लिटन यांच्या ‘चिमनी कॉर्नर स्टोरीज’ या पुस्तकामध्ये ‘द लिटिल बुली’ हा धडा आहे. याचे मूळ लेखक आणि त्यांची मूळ कथा याचा अभ्यास केला असता त्यात या मुलाचे नाव ‘हेन्री’ आहे. एन्.सी.ई.आर्.टी.ने हा धडा या पुस्तकात घेतांना त्याचे नाव ‘हरि’ केले आहे. यातून हिंदूंच्या देवतेचा अवमान करण्यात आला आहे.

‘अब्दुल’ चांगला मुलगा असल्याचे दाखवणारे पुस्तक !

एन्.सी.ई.आर्.टी.च्या चौथीच्या ईव्हीएस् पुस्तकामधील काही धड्यांमध्ये ‘अब्दुल’ नावाचे पात्र सतत दिसून येते. तो प्रत्येक काम चांगले करतो, इतरांना साहाय्य करतो, असे दाखवण्यात आले आहे. २७ क्रमांकाचा धडा ‘चुस्की गोज टू स्कूल’ यामध्ये अब्दुल एका अपंग मुलीला शाळेत नेण्यासाठी साहाय्य करतो, असे दाखवण्यात आले आहे, तर १९ क्रमांकांच्या ‘अब्दुल इन द गार्डन’ मध्ये अब्दुल त्याच्या वडिलांना बागकाम करतांना साहाय्य करतो, असे दाखवले आहे.