१. अलंकार गायनप्रकाराचा सराव करतांना श्रीकृष्णाच्या बासरीचा नाद ऐकू येणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हसरा तोंडवळा दिसून आनंद जाणवणे
‘२.३.२०२१ या दिवशी खरांचा (अलंकारांचा) सराव करतांना मला बासरीचे सूर ऐकू येऊन राधा त्या सुरांसोबत नृत्य करतांना दिसली. याच प्रकारे श्रीकृष्णाच्या बासरीचा नाद ऐकतांना ‘मी वृंदावनात आले आहे’, असे मला दिसले. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हसरा तोंडवळा दिसला. त्यांनी सूक्ष्मातून माझ्या डोक्यावर हात ठेवला असून माझ्या सहस्रारचक्रात चैतन्यरूपी लहरी जाणवल्या. माझे मन शांत आणि एकाग्र झाले. मला एक वेगळीच आनंदावस्था अनुभवायला मिळाली. त्यानंतर मला तुळस दिसली आणि मी त्या तुळशीचा हार परात्पर गुरु डॉक्टरांना घातला. तेव्हा ‘ते पुष्कळ आनंदी झाले आहेत’, असे मला दिसले आणि माझी भावजागृती झाली.

२. ‘स्वर हवेत तरंगत आहेत’, असे दिसणे आणि सात स्वर एकरूप होऊन पिवळा गोळा होणे अन् त्यामधून सर्वत्र चैतन्य पसरणे
६.३.२०२१ या दिवशी गायनाच्या सरावाच्या वेळी स्वर म्हणतांना ‘स्वर हवेत तरंगत आहेत’, असे दिसले. ‘सात स्वर एकरूप झाले. त्यांचा पिवळा गोळा सिद्ध होऊन त्यामधून सर्वत्र चैतन्य पसरत आहे’, असे जाणवले, तसेच मनातील विचार न्यून होऊन नामजप चालू झाला.’
– कु. मधुरा चतुर्भुज, पुणे (१३.३.२०२१)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |

देश दुर्दशेला पोचण्यामागे हे आहे कारण !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !