अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना नागपूर येथे अटक !

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

छायाचित्रात डावीकडे श्रीनिवास रेड्डी व उजवी कडे दीपाली चव्हाण

नागपूर – मेळघाटातील हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना येथे अटक करण्यात आली आहे. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नागपूर गुन्हे शाखेच्या साहाय्याने २८ एप्रिलच्या रात्री विलंबाने ही कारवाई केली. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत रेड्डी यांच्या नावाचा उल्लेख होता. दीपाली यांचा वरिष्ठ वनअधिकारी विनोद शिवकुमार यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानंतर याविषयी त्यांनी रेड्डी यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या; मात्र रेड्डी यांनी त्याकडे कानाडोळा केला होता. अटक टाळण्यासाठी ते इतके दिवस लपून छपून फिरत होते.