ज्या ठिकाणी धर्मांध बहुसंख्य होतात, तेथे ते कायदा आणि नियम धाब्यावर बसवतात, याचे हे उदाहरण आहे. हिंदूंना नेहमी आरोपीच्या पिंजर्यात उभे करणारी पुरोगामी मंडळी अशा विषयांत मात्र गप्प रहातात. सहिष्णु हिंदूंना आक्रमक ठरवायचे आणि आक्रमक धर्मांधांना अल्पसंख्यांक म्हणून गोंजारायचे, यालाच धर्मनिरपेक्षता म्हणायचे का ?

मुंबई – नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील रहमतनगर येथे अवैधरित्या हातगाड्या लावणार्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या अधिकार्याला धर्मांध फेरीवाल्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यात आला आहे. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा नोंदवला असून ३ जणांना अटक केली आहे.
मारहाण झालेल्या अधिकार्याचे नाव मधुकर डोंगरे असे आहे. रहमतनगर येथे अवैध हातगाड्या आणि दुकाने असलेल्यांकडून येथे वाहतुकीला अडथळा होत आहे. खरेदी करण्यासाठी येणार्या सर्वसामान्य नागरिकांशीही हे फेरीवाले वाद घालतात. याविषयी तक्रारी महानगरपालिकेकडे करण्यात आल्या होत्या. २६ एप्रिल या दिवशी अवैध धंदे करणार्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता तेथील धर्मांध फेरीवाल्यांनी डोंगरे यांच्यावर आक्रमण केले. या वेळी धर्मांधांच्या तावडीतून कसाबसा जीव वाचवून डोंगरे यांनी तेथून पलायन केले.
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !