‘गोकुळ’च्या निवडणुकीस स्थगिती देण्याची सत्तारूढ गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !


कोल्हापूर, २७ एप्रिल – गोकुळच्या (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ) निवडणुकीस स्थगिती मिळावी यासाठी सत्ताधार्‍यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. यावर राज्यशासनाला म्हणणे सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यावर निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने मतदानास स्थगिती देण्यास नकार देत निवडणूक मतदान केंद्रांची संख्या दुप्पट करून मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. गोकुळसाठी २ मे या दिवशी मतदान होणार असून ४ मे या दिवशी मतमोजणी होणार आहे.

२७ एप्रिल या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या निवडणुकीसाठी १२ तालुक्यांत ३५ मतदान केंद्र घोषित केली आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यात आणखी वाढ करावी लागणार आहे.