नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘श्रीमन्नारायण स्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार सिद्ध केलेले सप्तदेवतांचे नामजप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ऐकवले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दैवी शिकवणी संदर्भात त्यांनी काही मौलिक सूत्रे सांगितली. ती पुढे दिली आहेत.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीमन्नारायणाचे अवतार असले, तरी ते गुरुरूपातील अवतार आहेत. त्यामुळे ते केवळ सांगून सोडत नाहीत, तर शिकवून आणि करवून घेतात.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले हे गुरुरूपातील अवतार असल्यामुळे ते साधकाला योग्य दृष्टी देऊन त्याच्याकडून प्रयत्न करवून घेत असणे
ते गुरुरूप अवतार असल्यानेच त्यांच्याकडे गेल्यावर ते आपल्याला दृष्टी देतात. आपण जे आपल्या सामर्थ्याने पाहू शकत नाही, ते आपल्याला त्यांनी दृष्टी दिल्यावर यायला लागते. (‘प्रत्येक नामजप कसा म्हणायचा ?’, हे काही वेळा परात्पर गुरु डॉक्टर स्वत: म्हणून सांगायचे, तसेच ‘तो जप कसा म्हणायला हवा ?’, हे शब्दात सांगून माझ्याकडून त्याप्रमाणे म्हणवून घेत होते.)
३. त्यांच्याकडे जातांना बुद्धीचा भाग नकोच. केवळ श्रद्धेचाच भाग असायला हवा, तरच ‘ते काय सांगतात ?’, ते आपल्याला अत्यधिक ग्रहण होऊ शकते. बुद्धीचा भाग आल्यावर ग्रहण होणे अल्प होऊन आपल्या साधनेची हानी होण्याची शक्यता असते.
४. परात्पर गुरु डॉक्टर साधकाला ऊर्जा देऊन त्याची क्षमता वाढवत असल्यामुळे साधकाच्या पातळीला केलेल्या नामजपाची परिणामकारकता वाढत असणे
आपल्या वाणीत तेवढे चैतन्य नसते, तसेच जप भावपूर्ण म्हणण्याची क्षमता असतेच, असे नाही. परात्पर गुरु डॉक्टर आपल्याला ऊर्जा देत जातात आणि आपली क्षमता वाढवतात. त्यामुळे आपल्या पातळीला केलेल्या नामजपाची परिणामकारकता त्यांच्या सामर्थ्याने वाढते.’
– कु. तेजल पात्रीकर, रामनाथी आश्रम, गोवा. (३.११.२०२०)
कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप ऐकतांना भाव जागृत होऊन देवाची भेट झाल्याचे जाणवणे

‘५.८.२०२० या दिवशी अयोध्या येथे श्रीरामजन्मभूमीचा शिलान्यास सोहळा होता. त्यानिमित्त रामनाथी आश्रमात कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप लावला होता. कु. तेजलताईने भावपूर्ण म्हटलेला हा नामजप ऐकतांना माझा भाव जागृत झाला. ‘या नामजपाने मला सूक्ष्मातून त्रास देणार्या मोठ्या वाईट शक्तीचे अस्तित्व न्यून झाले. ‘तो नामजप करतांना मी खोल खोल जात आहे’, असे मला वाटले. कु. तेजलताईने तो नामजप भावपूर्ण म्हटला असल्याने ‘तिने जणू जपाच्या माध्यमातून देवाशीच भेट घालून दिली आणि देवच त्या नामजपातून मला भेटत आहे’, असे मला जाणवले.
‘देवाने निर्मिलेले हे विश्व किती मोठे, व्यापक आणि सूक्ष्म आहे’, हे मला अनुभवण्यास आणि शिकण्यास मिळाले.’ – सौ. रंजना गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.८.२०२०)
|

साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !
अर्थाचा अर्थ, भावार्थ, साधना आणि गुरुकृपा यांचे महत्त्व !
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !