केरळमध्ये हिंदु तरुणाशी विवाह केल्यामुळे मुसलमान तरुणीला ठार करण्याचा तिच्या कुटुंबियांचा प्रयत्न !

प्रतीकात्मक चित्र

थिरूवनंतपूरम् (केरळ) – राज्यातील पथानमथिट्टा जिल्ह्यातील कलंजूर येथे एका हिंदु मुलाशी विवाह केल्यामुळे मुसलमान तरुणीच्या कुटुंबियांनी तरुणीला ठार करण्याचा प्रयत्न केला. या आंतरधर्मीय विवाहामुळे ते अप्रसन्न होते. ही तरुणी तिच्या माहेरी गेल्यावर तिची बहिण आणि भावोजी यांनी तिला मारण्याचा प्रयत्न केला. यात ती घायाळ झाल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. (केरळमध्ये लव्ह जिहादच्या सहस्रो घटना घडल्या आहेत. त्या वेळी धर्मांधांना आंतरधर्मीय विवाहाचा त्रास का होत नाही ? याविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ? – संपादक)