
सांगली – शिंदे मळा येथील दुधनकर रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील वैद्यकीय कचरा महापालिकेच्या घंटागाडीत टाकून घनकचरा व्यवस्थापन कायद्याचा भंग केला. त्यामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार दुधनकर रुग्णालयास १ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रातील कोणत्याही रुग्णालयांनी त्यांचा वैद्यकीय कचरा हा उघड्यावर, महापालिकेच्या कचरा कंटेनर अथवा घंटागाडीमध्ये न टाकता यासाठी नियुक्त सूर्या एजन्सी यांच्याकडे जमा करायचा आहे. याचे उल्लंघन झाल्यास त्या रुग्णालयावर दंडात्मक कारवाई समवेत कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !