
सातारा – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची वार्षिक चैत्र यात्रा कोरोनाच्या संसर्गामुळे रहित करण्यात आली आहे, याविषयीचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी २० एप्रिल या दिवशी घोषित केले.
शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या वार्षिक यात्रेचा कालावधी १७ ते २७ एप्रिल असा असून यात्रेचा मुख्य दिवस २३ आणि २४ एप्रिल हा आहे. शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेस सातारा जिल्ह्यातील तसेच सोलापूर, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, सांगली, धाराशीव, बीड या जिल्ह्यांतूनही भाविक मोठ्या प्रमाणावर येत असून जिल्ह्यातून येणार्या भाविकांना त्यांच्या जिल्ह्याच्या सीमेवर अटकाव करण्यात येणार असल्यामुळे कोणीही या यात्रेसाठी येऊ नये, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !