हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रत्येक घरातून प्रयत्न होणे आवश्यक ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वोत्तर राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. शंभू गवारे

संभलपूर (ओडिशा) – हिंदु संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी प्रत्येक घरातून प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोेत्तर राज्य संघटक श्री. शंभू गवारे यांनी केले. हिंदु नववर्षाच्या पूर्वसंध्येला ‘विप्र फाऊंडेशन, ओडिशा’च्या वतीने एका ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. गवारे यांनी हिंदु नववर्ष तिथीनुसार साजरे करण्यामागील शास्त्र, नववर्ष साजरे करण्यामागील नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे अन् ते साजरे करण्याची योग्य पद्धत यांविषयी विस्तृत माहिती दिली.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विप्र फाऊंडेशनचे ओडिशाचे प्रांतीय महासचिव श्री. शरद शर्मा यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमामध्ये विप्र फाऊंडेशनचे राष्ट्रीय संघटनमंत्री श्री. सुनील शर्मा, प्रांतीय अध्यक्ष श्री. राम अवतार शर्मा, प्रांतीय महासचिव श्री. महेश शर्मा, श्री. अशोक चौबे, प्रांतीय उपाध्यक्ष श्री. कैलाश शर्मा, श्री. जुगलकिशोर शर्मा, प्रांतीय महिला प्रकोेष्ठ अध्यक्ष पूनम शर्मा आणि प्रांतीय मीडिया प्रभारी श्री. मनोज शर्मा यांनी सहभाग घेतला.

क्षणचित्रे

  • हिंदु जनजागृती समितीच्या उपक्रमांची माहिती ऐकून उपस्थित लोक प्रभावित झाले. त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. ‘आज तुम्ही जे सांगितले, ते यापूर्वी आम्ही कधीच ऐकले नव्हते’, असेही या वेळी अनेकांनी सांगितले.
  • ‘अशा प्रकारे आम्ही महिलांसाठीही ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांचे आयोजन करू’, असे पूनम शर्मा यांनी सांगितले.