जसलोक रुग्णालय कोरोना रुग्णालयात रूपांतरीत !

मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई – मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पेडर रोड येथील जसलोक या खासगी रुग्णालयाला कोरोना रुग्णालयामध्ये रूपांतरीत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. महानगरपालिकेकडून रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला त्याप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या रुग्णालयातील अन्य रुग्णांना उपचारासाठी अन्यत्र हालवण्यात येणार आहे. १७ एप्रिलच्या सकाळपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी २५० खाटा वाढवण्यात येणार आहेत.

७ दिवसांत गोरेगाव येथे १ सहस्र ५०० खाटा वाढवण्यात येणार

गोरेगाव नेस्को येथील ‘कोविड केअर सेंटर’मध्ये येत्या ७ दिवसांत १ सहस्र ५०० खाटा वाढवण्यात येणार आहेत. या सर्व खाटांना प्राणवायूची सुविधा असेल, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.