भारतात कोरोनाच्या काळात ख्रिस्ती मिशनरी पोचले ५० सहस्र गावांत ! 

१ लाख लोकांचे धर्मांतर, तर शेकडो चर्च उभारल्याचा दावा

संकटाच्या काळात धर्मांतराचा प्रयत्न करणारे मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे ख्रिस्ती मिशनरी ! अशांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ धर्मांतरविरोधी कायदा करावा !

नवी देहली – भारतात कोरोना महामारीच्या काळात जितक्या चर्चची उभारणी झाली, तितकी गेल्या २५ वर्षांत झालेली नाही. आतापर्यंत ख्रिस्ती मिशनरी ५० सहस्र गावांत पोचले आहेत. त्यांतील २५ टक्के गावांमध्ये ‘गॉस्पेल’ (येशू ख्रिस्ताची शिकवण) पोचवण्याचा प्रयत्न चालू आहे. या काळात १ लाख लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आहे.

आता ते येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवत आहेत आणि चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत आहेत. प्रत्येक चर्च १० गावांमध्ये प्रार्थना आयोजित करत आहे, असा दावा ‘अनफोल्डिंग वर्ल्ड’  या संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिव्स यांनी एका ऑनलाईन कार्यक्रमात केला. ‘अनफोल्डिंग वर्ल्ड’ ही संस्था बायबलचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करण्यासाठी साधन उपलब्ध करून देते.

डेव्हिड रिव्स यांनी सांगितले की,

१. जसजसे निर्बंध हटवण्यात आले, तसतसे मिशनरी सक्रीय झाले.

हे कार्य कठीण आहे; कारण यात काही मिशनरी मारले गेले. (अशा घटना भारतात कुठेही घडल्याचे ऐकिवात नसतांना खोटी माहिती देऊन हिंदूंना असहिष्णु ठरवण्याचाच हा प्रयत्न असल्याने रिव्स यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक) या कार्यात अनेक संकटे असली, तरी चर्चला कार्य करण्यास कुणीही थांबवू शकत नाही.

२. कोरोनाच्या काळात लोक एकमेकांना भेटू शकत नसल्याने दूरभाष आणि व्हॉट्सअ‍ॅप यांद्वारे त्यांच्यापर्यंत प्रार्थना पोचवण्यास प्रारंभ केला.