‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’च्या वतीने कुडाळ पोलीस ठाण्यानजीकच्या चौकाचे ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक’, असे नामकरण

कुडाळ – १२ एप्रिल या धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानदिनानिमित्त ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग’ या संघटनेच्या वतीने कुडाळ शहरातील पोलीस सर्कल परिसराचे (पोलीस ठाण्याजवळील चौकाचे) ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक’, असे मोठ्या उत्साहात नामकरण करण्यात आले.

या वेळी कुडाळ येथील शिवप्रेमी, तसेच प्रतिष्ठित नागरिक श्री. विवेक पंडित सर म्हणाले की, आजपासून या परिसराला कुडाळमधील नागरिकांनी ‘संभाजी महाराज चौक’ असे संबोधून आम्हाला सहकार्य करावे. यापुढे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या परिसरात उभारण्याचा शिवप्रेमींचा मानस आहे, त्यालाही सर्व कुडाळवासियांनी सहकार्य करावे.

या वेळी नगरसेविका संध्याताई तेरसे, नगरसेवक सुनील बांदेकर, सतीश म्हाडदळकर, गुरुदास प्रभु, महेश अडसुळे, रोशन ठाकुर, संग्राम सावंत, सुभाष सावंत, स्वरूप वाळके, विवेक बोभाटे, किरण कुडाळकर, रमाकांत नाईक आदी उपस्थित होते.