छबडा (राजस्थान) येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांधांकडून हिंदूंवर प्राणघातक आक्रमण

पोलीस आणि अग्नीशमन दल यांच्या कर्मचार्‍यांवरही आक्रमण

काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांना अधिक चेव येतो आणि ते हिंदूंवर कोणत्याही कारणाने आक्रमण करतात, हे पुनःपुन्हा दिसून येते. यासाठी देशाला काँग्रेसमुक्त करणे अपरिहार्य !

धर्मांधांकडून हिंदूंवर प्राणघातक आक्रमण

बारां (राजस्थान) – येथील छबडा भागातील धरनावदा चौकामध्ये क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी हिंसाचार केला. यात अनेक दुकानांची जाळपोळ करण्यासह पोलीस आणि अग्नीशमन दलाचे कर्मचारी यांच्यावर आक्रमण करण्यात आले. यामुळे पोलिसांनी लाठीमार केला, तसेच कलम १४४ लागू केले आहे. येथील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला आहे.

येथे ११ एप्रिल या दिवशी कमल सिंह हे गाड्यावर फळे विकत घेत असतांना  फरीद, आबिद आणि समीर यांच्याशी वाद झाला. त्यातून या धर्मांधांनी कमल सिंह  यांच्यावर चाकूने वार केला. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले येथील दुकानदार राकेश नागर यांच्यावरही धर्मांधांकडून आक्रमण करण्यात आले. यानंतर हिंसाचार झाला. या आक्रमणात घायाळ झालेले सिंह आणि नागर यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, तर पोलिसांनी तिघाही धर्मांधांना अटक केली आहे.