
कुडाळ – कोरोनाची साथ आटोक्यात येईपर्यंत तालुक्यातील पिंगुळी येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधीमंदिर, तसेच समाधीमंदिर परिसरातील दत्तमंदिरासह सर्व मंदिरे आणि येथील अन्नदान सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांनी दिली.
श्री क्षेत्र पिंगुळी येथे भाविकांची सतत वर्दळ असते. प्रतिदिन दुपारी आणि रात्री ३०० भाविक अन्नदान सेवेचा लाभ घेतात; परंतु सध्या कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत असून त्यावर उपाययोजना म्हणून उपरोक्त मंदिरांसह अन्नदान सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत श्रींची नित्यपूजा, आरती, अभिषेक आदी दैनंदिन सेवा सेवेकर्यांच्या वतीने चालू रहाणार आहेत. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांनी केले आहे.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !